गेल्या पाच वर्षात सातारा पालिकेत खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीस कोणतेही ठोस काम करता आलेले नाही. हे सारे अपयश लुंगीत लपविण्याचा प्रकार म्हणावा लागेल अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले मी केलेल्या कोणता तरी कामाच्या प्रेमात ते पडले आहेत. राजकीय लोकांना फॅन्सी ड्रेस पार्टी करावी लागत आहे हा गमंतीचा भाग आहे. जसं जसं चित्रपट येतील तसं तसं आपण पाहू या. सातारा पालिकेत काय केले हे सांगता येत नसल्याने कूठं लुंगी घालून फिर, कूठं गाणी लावून फिर आता हे असेच होणार आहे. सातारकरांनी केवळ त्याकडे मनोरंजन म्हणून पहावे आणि सोडून द्यावे. पालिका निवडणुकीत सातारकर त्यांना नक्की हद्दपार करतील असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.